बऱ्याचदा वाहनांच्या नंबरप्लेटवर साधा सरळ नंबर लिहिलेला दिसत नाही. इतरांपेक्षा वेगळं दिसण्यासाठी किंवा क्रेझ म्हणून तरूणाई किंवा इतर काही वाहन चालक फॅन्सी नंबरप्लेटचा वापर करतात. तुम्ही देखील तुमच्या वाहनाला फॅन्सी नंबरप्लेट लावली आहे का… तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
(हेही वाचा – मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर ‘ED’ चं ऑफिस! चर्चांना उधाण)
वाहनांच्या नंबरप्लेटवरील अक्षरे व त्यांचा आकार याबाबत ‘सेंट्रल मोटार व्हेइकल अॅक्ट’नुसार नियम ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार वाहनांवर नंबरप्लेट लावणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे फॅन्सी नंबरप्लेट, इतर नावाच्या पाट्या लावून नियमांचे उल्लंघन करणं आता वाहनचालकांना चांगलेच महागात पडू शकते. कारण आता अशा वाहन चालकांना हजार रूपयांचा भुर्दंड बसू शकतो. दरम्यान, मोटार वाहन विभागाने दुचाकी व चारचाकी गाड्यांचे नोंदणी क्रमांक कसे लिहावेत, यासंबंधी नियमावली स्पष्ट केली आहे. परंतु, कित्येक वाहनचालक हे नियम पायदळी तुडवतात. याबाबत सातत्याने आवाहन केले जाते आणि कारवाई करण्याचा इशारासुद्धा दिला जातो त्यानंतरही फॅन्सी नंबर प्लेटचा वापर दिसतो.
कशी हवी नंबरप्लेट ?
- नंबर लिहिताना इंग्रजी लिपीचाच वापर करावा.
- पांढऱ्या प्लेटवर काळी अक्षरे असावीत.
- नंबरप्लेटवर क्रमांकाशिवाय इतर काहीही (नाव, नक्षी, चित्र, फोटो, आदी.) चालत नाही.
- हे क्रमांक स्पष्ट व सरळच असावे लागतात. ते फॅन्सी नसावेत.
- सर्व दुचाकी आणि तीनचाकी वाहनांवरील पाठीमागच्या नंबर प्लेटवरील अक्षरांची उंची ३५ सेंमी असावी आणि रुंदी ७ सेंमी असावी. त्यामधील अंतर ५ सेंमी असावे.