सरनाईकांना ‘या’ प्रकरणी मोठा दिलासा, पोलिसांनी अहवालात म्हटले काय?

144

टॉप्स सिक्युरिटीज घोटाळ्याप्रकरणी अडचणीत आलेले शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाबाबत मुंबई पोलिसांकडून सादर करण्यात आलेल्या अहवालात आरोप सिद्ध करण्यासाठी पुरुसे पुरावे नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान आता ईडीकडून देखील याच अहवालाच्या आधारे क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

मुंबई पोलिसांचा सी समरी रिपोर्ट

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून टॉप्स सिक्युरिटीज प्रकरणात सी समरी रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. प्रताप सरनाईक यांच्यावरील आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचे पोलिसांनी या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. याच रिपोर्टच्या आधारे आरोपींनी ईडीच्या कारवाईविरोधात अर्ज करण्यात आला आहे. अमित चांदोले आणि टॉप्स सिक्युरिटीजचे माजी संचालक शशिधरन यांनी दोषमुक्तीसाठी अर्ज सादर केला आहे.

(हेही वाचाः ईडीची मोठी कारवाई, Paytm सह इतर पेमेंट कंपन्यांचे कोट्यवधी रुपये गोठवले)

न्यायालयात याचिका

चांदोले हे शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय आहेत. पोलिसांनी सादर केलेला सी समरी रिपोर्ट हा न्यायालयाने स्वीकारला आहे. त्यामुळे ईडीने दाखल केलेल्या प्रकरणाला आता अर्थ उरत नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. दरम्यान मुंबई सत्र न्यायालयाने ईडीला 21 सप्टेंबर पर्यंत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. तोपर्यंत शशिधरन आणि चांदोले यांना कोठडीतच ठेवण्याचे निर्देश देखील न्यायालयाने दिले आहेत.

काय आहे प्रकरण?

2014 साली एमएमआरडीएला 350 ते 500 सुरक्षा रक्षक पुरवण्याचे कंत्राट टॉप्स सिक्युरिटी ग्रुपला देण्यात आले होते. मात्र या कंत्राटात घोटाळा करण्यात आला आणि त्यातून प्रताप सरनाईक आणि अमित चांदोले यांना आर्थिक फायदा झाल्याची तक्रार कंपनीच्या एका माजी कर्मचा-याने केली होती. या कंत्राटामध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत ईडीने मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत टॉप्स ग्रुपचे माजी व्यवस्थापकीय संचालक एम.शशिधरन यांना अटक केली होती. याचवेळी ईडीने आमदार सरनाईकांचे घर आणि कार्यालय यांच्यावर धाडी टाकत कुटुंबीयांची देखील चौकशी केली. यामध्ये सरनाईकांचे निकटवर्तीय अमित चांदोले यांनाही ईडीने अटक केली.

(हेही वाचाः नवी मुंबईत राष्ट्रवादीला मुख्यमंत्र्यांचा धक्का, माजी नगरसेवकांसह तालुकाध्यक्ष शिंदे गटात)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.