गेल्या दोन दिवसांपासून मुंबई व महानगर परिसराला झोडपणाऱ्या पावसाने ठाणे, वसई आणि कल्याण परिसरात शंभर मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. गेल्या 12 तासात ठाणे आणि कल्याण परिसरात संपूर्ण महानगर परिसराच्या तुलनेत जास्त पाऊस झाल्याचे वेधशाळेच्या नोंदीत आढळले. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पालघर मध्ये शुक्रवार आणि शनिवारी अतिवृष्टीसाठी ऑरेंज तर ठाण्यात शुक्रवारी अतिवृष्टीसाठी ऑरेंज तर शनिवारसाठी मुसळधार पावसासाठी येलो अलर्ट राहिल.
( हेही वाचा : हैदराबाद मुक्ती संग्राम : भाजपा आणि TRS येणार आमनेसामने)
शुक्रवारी सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत ठाणे, ऐरोली, वाशी, कोपरखैराणे या भागात पावसाने सकाळपासूनच जोरदार हजेरी लावली होती. मुंब्रा येथे 118.4 मिमी पाऊस झाला. ठाण्यातील अंतर्गत भागात तसेच कल्याण- डोंबिवलीला पावसाने रौद्ररूप धारण केले होते. ठाण्यात चिरागनगरमध्ये 143.3 मिमी, ढोकळीत 128 मिमी तर मानपाड्यात 123.4 मिमी पाऊस झाला. डोंबिवली पूर्वेला 134.2 मिमी तर पश्चिमेला 147 मिमी पावसाची नोंद झाली. डोंबिवली नजीकच्या भोईरवाडी परिसरात 101.3 मिमी, विठ्ठलवाडीत 102 मिमी,आधारवाडी येथे 115.2 मिमी आणि कल्याण शिवाजी चौकात 112.7 मिमी पाऊस झाल्याचे वेधशाळेच्या नोंदीत आढळून आले. वसईत विद्यावर्धिनी इंजिनिअरिंग परिसरात 126.7 मिमी पाऊस झाला.
नवी मुंबई ते पनवेल परिसरात संततधार
शुक्रवारी वाशी, सानपाडा,नेरुळ,बेलापूर परिसरात दिवसभर पाऊस सुरु होता. कोपरखैराणे येथे 93.2 मिमी पाऊस झाला. पनवेल परिसरात 56.8 मिमी पावसाची नोंद झाली.
Join Our WhatsApp Community