हैदराबाद मुक्तीसंग्रामदिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते औरंगाबादमध्ये ध्वजारोहण; मराठवाड्यासाठी केल्या ‘या’ घोषणा

185

भारताच्या स्वातंत्र्यानंतर 13 महिने मराठवाड्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. त्यानंतर 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाने आत्मसमर्पण केले. त्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावत ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी मराठवाड्यासाठी विविध घोषणा केल्या.

मुख्यमंत्री म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभागी होऊन आपले रक्त सांडणा-या सर्वच ज्ञात- अज्ञात वीरांना त्यांनी दिलेल्या बलिदानाबद्दल विनम्रतापूर्वक अभिवादन. हा लढा सोप नव्हता मात्र रझाकारीच्या जोखडातून स्वत:ची मुक्तता करुन स्वातंत्र्याची पहाट अनुभवण्यासाठी या वीरांनी जे बलिदान दिले त्याबद्दल त्यांचे राज्यातील जनतेच्यावतीने आभार. त्यांच्या बलिदानातून स्वतंत्र झालेल्या मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष भरुन काढू असे, आश्वासन देत त्यांनी यावेळी विविध घोषणा केल्या. केंद्र सरकारकडून स्वच्छ भारतसाठी 12 हजार कोटी मिळाले असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

( हेही वाचा: Bank Holiday In October : ऑक्टोबर महिन्यात एवढे दिवस राहणार बॅंका बंद! लगेच उरकून घ्या महत्त्वाची कामे )

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा

  • औरंगाबादमधील वेरुळ मंदिरासाठी 136 कोटी
  • पैठणमध्ये संत उद्यान, पाणीपुरवठा योजना, शिर्डी महामार्ग, क्रीडा संकुल बनवणार
  • जायकवाडी कालवा दुरुस्ती करणार
  • मराठवाड्यात पाणी वळवण्याचा प्रकल्प
  • जालना पाणी पुरवठा नूतनीकरण
  • नांदेड जिल्हा क्रीडा संकुलासाठी निधी देणार
  • लातूरमध्ये कृषी महाविद्यालय तरतूद
  • मराठवाडा वाटर ग्रीडमधूल लातूरसाठी मान्यता

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.