तब्बल ४० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दक्षिण आफ्रिकेच्या गवताळ प्रदेशातून भारतात ८ चित्त्यांचे पुनरागमन होणार आहे. मध्यप्रदेशाच्या कुनो अभयारण्यात आठ चित्ते आणले जाणार आहेत. मध्यप्रदेशानंतर गुजरात आणि महाराष्ट्रातही पुढच्या टप्प्यांत चित्ते दाखल होऊ शकतात. केंद्रीय पर्यावरण व वने तसेच वातावरण बदल विभागाच्या योजनेत गुजरात आणि महाराष्ट्र राज्यातही चित्त्यांना आणण्याची योजना आहे.
( हेही वाचा: तुमच्या वाहनाला फॅन्सी नंबरप्लेट लावताय? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची )
या योजनेची कागदोपत्रीही तयारी झाल्याची माहिती सूत्रांच्यावतीने देण्यात आली आहे. मात्र मध्य प्रदेशात चित्ते रुळल्यानंतर तसेच त्यांना मध्य प्रदेशातील गवताळ वातावरण रुचेल की नाही, याबाबतची पाहणी केल्यानंतर पुढच्या तयारीला सुरुवात होईल. चित्ता या मांजरकुळातील वन्यप्राण्याला गवताळ प्रदेश गरजेचा असतो. राज्यातील गवताळ प्रदेशाचा -हास हा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याने याबाबतीत अगोदर उपाययोजना कऱण्याकडे भर दिला जावा, अशी मागणीही होत आहे. मध्य महाराष्ट्रात गवताळ प्रदेशाच्या संवर्धनासाठी आता वनविभागाकडून हालचाली होत आहे. मध्य महाराष्ट्रातील गवताळ प्रदेशाला संरक्षित क्षेत्र घोषित करण्यासाठी आवश्यक हालचाली पुणे वनविभाग (प्रादेशिक)ने सुरु केल्या आहेत. यात प्रामुख्याने कोल्ह्याच्या संवर्धनासाठी गवताळ प्रदेश आवश्यक असल्याने स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने प्राथमिक स्तरावर वनविभागाने हालचाली सुरु केल्या आहेत. याच धर्तीवर राज्यभरातील गवताळ प्रदेशाचे संवर्धनाची मागणी आता वन्यजीवप्रेमींनी केली आहे.
या योजनेची कागदोपत्रीही तयारी झाल्याची माहिती सूत्रांच्यावतीने देण्यात आली. मात्र मध्य प्रदेशात चित्ते रुळल्यानंतर तसेच त्यांना मध्य प्रदेशातील गवताळ वातावरण रुचले की नाही, याबाबतची पाहणी केल्यानंतर पुढच्या तयारीला सुरुवात होईल. चित्ता या मांजरकुळातील वन्यप्राण्याला गवताळ प्रदेश गरजेचा असतो. राज्यातील गवताळ प्रदेशाचा -हास हा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याने याबाबतीत अगोदर उपाययोजना कऱण्याकडे भर दिला जावा, अशी मागणीही होत आहे. मध्य महाराष्ट्रात गवताळ प्रदेशाच्या संवर्धनासाठी आता वनविभागाकडून हालचाली होत आहे. मध्य महाराष्ट्रातील गवताळ प्रदेशाला संरक्षित क्षेत्र घोषित करण्यासाठी आवश्यक हालचाली पुणे वनविभाग (प्रादेशिक)ने सुरु केल्या आहेत. यात प्रामुख्याने कोल्ह्याच्या संवर्धनासाठी गवताळ प्रदेश आवश्यक असल्याने स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने प्राथमिक स्तरावर वनविभागाने हालचाली सुरु केल्या आहेत. याच धर्तीवर राज्यभरातील गवताळ प्रदेशाचे संवर्धन आता मागणी वन्यजीवप्रेमींनी केली आहे.
Join Our WhatsApp Community