दसऱ्याच्या दिवशी जसे शिवसेनेच्या दस-या मेळाव्याची चर्चा असते, तशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरात होणा-या मेळाव्याचीही चर्चा जोरदार सुरु असते. या मेळाव्यात यंदाच्या वर्षी प्रथमच महिला प्रमुख पाहुणे असणार आहेत. त्यामुळे यंदाचा संघाचा मेळावा चर्चेत येणार आहे.
संघाचे टिकेला उत्तर
संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसबळे यांनी संघटनेच्या बैठकीत, संघात महिलांचा सहभाग तुलनेने कमी असल्याबद्दल खंत व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर आता संघाच्या वार्षिक दसरा सोहळ्यात गिर्यारोहक संतोष यादव या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. प्रतिभावान गिर्यारोहक संतोष यादव यांना यंदा निमंत्रित करण्यात आले आहे. यामुळे कालपर्यंत संघात महिलांचा अधिक सहभाग नसतो, अशी टिका होत असते, पण संघाने दसरा मेळाव्यात महिला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केल्याने त्यांच्यावर होणा-या टिकेला उत्तर दिले आहे. कुटुंब आणि समाजातील मूल्यांचा प्रसार करणे हा संघाच्या कुटुंब प्रबोधन कार्यक्रमाचा उद्देश आहे. त्यावर संघाने नव्याने लक्ष केंद्रित केले असल्याची माहिती आहे.
(हेही वाचा याआधी शिवसेनेची दसरा मेळाव्याची ‘तोफ’ शिवाजी पार्कमध्ये कितीवेळा थंडावलेली?)
कोण आहेत संतोष यादव?
संतोष यादव मूळचे हरियाणाचे आहेत. त्या एक अतिशय प्रतिभावान गिर्यारोहक आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, माऊंट एव्हरेस्ट हे शिखर दोनदा सर करणारी त्या पहिल्या महिला आहेत. सन २००० मध्ये संतोष यादव यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community