७५ दिवसांच्या ‘स्वच्छ समुद्र, सुरक्षित समुद्र’ या मोहिमेची सांगता

152

“स्वच्छ समुद्र-सुरक्षित समुद्र” या उपक्रमातील मोठ्या किनारपट्टी अभियानात शनिवारी दोन ते तीन हजार युवक सहभागी होत आहे, हे नक्कीच प्रशंसनीय आहे. महाराष्ट्राला तर ७२० किमीचा किनारा लाभला आहे. त्यामुळे सागरी प्रदूषणाचा फटका पर्यटनाबरोबरच पर्यावरणाला होत आहे. म्हणूनच पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर समुद्र स्वच्छ हवा. समुद्र स्वच्छ राहिला तर किनारपट्टी स्वच्छ राहील. नाहीतर समुद्र तळाशी साचलेला कचरा किनारपट्टीवर ढकलत राहील. प्रदूषण वाढत राहील. आजच्या मोहिमेत सहभागी झालेल्या या युवकांनी स्वच्छता आणि सुरक्षिततेचा संकल्प करावा व हा संकल्प करून त्यांनी सर्वांपर्यंत पोहोचवावा, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.

७५ दिवसांची ‘स्वच्छ समुद्र, सुरक्षित समुद्र’ मोहीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने मुंबईत ५ जुलैपासून सुरू करण्यात आलेल्या ७५ दिवसांच्या ‘स्वच्छ समुद्र, सुरक्षित समुद्र’ या मोहिमेची शनिवारी सागरी किनारा स्वच्छता आंतरराष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने आयोजित विशेष स्वच्छता अभियानाद्वारे सांगता कार्यक्रमात चव्हाण बोलत होते. यावेळी मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, अनंत सिंघानिया, समीर सोमय्या, अजित मांगरुलकर, रवींद्र सांगवी भारतीय तटरक्षक दलातील वरिष्ठ आधिकारी यांच्यासह नागरिक आणि विद्यार्थ्यी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, राज्याला ७२० किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. त्याची सुरक्षा महत्त्वाची आहे. समुद्राच्या स्वच्छतेचे जबाबदारी नागरिकांची आहे, त्यांनी ती स्वीकारुन समुद्राशेजारी राहण्याऱ्या कोळी बांधवांशी समन्वय ठेऊन स्वच्छता आणि सुरक्षिततेवर लक्ष देणे गरजेच असल्याचे त्यांनी सांगितले.

या ७ प्रमुख चौपाट्यांवर ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना चव्हाण यांनी सांगितले की, राज्यात आजपासून २ ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून लोकांमध्ये नवचैतना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. २०१४ पासून देशात विविध जनआंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी लोकजागरणाचा प्रयत्न केला आहे.

केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या नियोजनानुसार भारताच्या किनार पट्टीवर राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेंतर्गत देशभारातील ७५ समुद्र किनाऱ्यावर ७५ दिवसांची ही मोहीम राबविण्यात आली. मुंबईतील गिरगांव, दादर, माहीम, जुहू, वर्सोवा, मढ- मार्वे- आक्सा, गोराई- मनोरी या ७ प्रमुख चौपाट्यांवर ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध स्वयंसेवी संस्थांनी उल्लेखनीय सहभाग नोंदविला. या कार्यक्रमादरम्यान स्वच्छता, गुणवंत कर्मचारी-संस्था यांना प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.