अजित पवार यांना खूप वेळ आहे. पण मला नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे. राज्य सरकारमधील अर्ध्याहून अधिक मंत्र्यांनी पितृपक्ष असल्याने अद्याप मंत्रालयातील दालनात कार्यभार स्वीकारलेला नाही, असे कळते. परंतु जग कुठे चालले आहे आणि यांचा पितृपक्षामुळे कारभार अडला आहे, असे सांगत अजित पवार यांनी शिंदे-भाजप सरकारवर सडकून टीका केली होती. अजित पवार यांनी केलेल्या टीकेबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर, अजित पवारांना खूप वेळ आहे, ते असे सगळे आरोप करत राहतील. त्याची उत्तरे द्यायला मला वेळ आहे, मला खूप कामे आहेत, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
(हेही वाचा याआधी शिवसेनेची दसरा मेळाव्याची ‘तोफ’ शिवाजी पार्कमध्ये कितीवेळा थंडावलेली?)
विरोधक कुठलीही माहिती न घेता बोलतात
देवेंद्र फडणवीस यांना जलयुक्त शिवार योजनेची चौकशी सुरू असल्याबाबतही प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी सूचक शब्दांत उत्तर दिले. शिंदे-फडणवीस अस्तित्वात आल्यापासून प्रस्ताव स्थगिती सुरू आहेत. १३८ उद्योग एमआयडीसीमध्येच अडकले असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. यावर बोलताना, विरोधकांना कुठलीही माहिती नाही. कुठलीही माहिती न घेता ते बोलतात त्यामुळे ज्यांना माहिती नाही, अशा विरोधकांच्या प्रश्नांना मी उत्तर देत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community