मुंबईकरांना ‘बेस्ट’ गिफ्ट! डिसेंबरपर्यंत ८०० एसी बस ताफ्यात येणार

148

मुंबईकर प्रवाशांच्या गारेगार प्रवासासाठी बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात येत्या डिसेंबरपर्यंत ८०० वातानुकूलित बस दाखल होणार आहेत. या बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार असून यात एकमजली, दुमजली, प्रिमियम बसेसचा समावेश असणार आहे. यामुळे बेस्टच्या ताफ्यातील स्वमालकीच्या बसच्या तुलनेत भाडेतत्त्वावरील बसची संख्या वाढणार आहे. बेस्ट उपक्रमाने खर्च कमी करण्यासाठी स्वमालकीऐवजी भाडेतत्वावरील बस घेण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण बसताफा ७ हजार झाल्यानंतर स्वमालकीच्या बस घेण्यात येतील अशी माहिती लोकेश चंद्र यांनी दिली. सध्या बेस्ट उपक्रमाकडे मालकीच्या १ हजार ८३६ बसगाड्या आहे.

( हेही वाचा : बेस्टचा स्वस्त मस्त प्रवास! मासिक, त्रैमासिक बसपासमध्ये ५० टक्के बचत)

८०० वातानुकूलित बस ताफ्यात येणार 

बेस्ट उपक्रमाने डिसेंबर २०२२ पर्यंत ८०० वातानुकूलित बस ताफ्यात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी २०० आरामदायी अशा प्रिमियम बस असून या बसगाड्यांमधील आसन प्रवाशांना आधीच मोबाईल App वरून आरक्षित करता येणार आहे. या सर्व बसगाड्या वीजेवर धावणार आहेत. बेस्टच्या वातानुकूलित दुमजली बसची चाचणी सध्या पुण्यात सुरू आहे. चाचणी पूर्ण झाल्यावर ही दुमजली बस प्रत्यक्षात सेवेत सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येईल.

या मार्गावर प्रिमियम बस धावणार

२६ सप्टेंबरपासून बेस्ट उपक्रमाअंतर्गत BKC ते ठाणे या मार्गावर प्रिमियम बससेवा सुरू करण्यात येणार आहे. सीएसएमटी, नरिमन पॉइंट, ठाणे, मिरा रोड, बीकेसी, पवई, लोअर परळ या मार्गावर या बसेस उपलब्ध असतील. या प्रिमियम बसचे तिकीट सर्वसाधारण व वातानुकूलित बसेसपेक्षा अधिक असेल मात्र ओला, उबेरपेक्षा स्वस्त असेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.