सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान एका धावपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी साताऱ्यात हाफ हिल मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ३२ वर्षीय राज क्रांतीलाल पटेल या कोल्हापुरातील मार्केट यार्ड परिसरात राहणाऱ्या तरूणाचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धा सुरू असताना ही घटना घडली. मॅरेथॉन स्पर्धा सुरू झाल्यानंतर स्पर्धेच्या परतीच्या मार्गादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. स्पर्धक सातारा ते कास रोड आणि पुन्हा कास रोज ते पोलीस परेड ग्राऊंड अशा परतीच्या मार्गावर होते. या दरम्यान अचानक राज याच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे तो त्याठिकाणी जागेवर पडला. ज्यानंतर त्याचजागी त्याचा जागेवर मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. घटना घडल्यानंतर त्याला प्राथमिक उपचार देण्याचा प्रयत्नही करण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
(हेही वाचा – शिंदे-फडणवीस सरकारचा आणखी मोठा निर्णय! सचिवांना दिलेले अधिकार पुन्हा मंत्र्यांकडे)
दरवर्षी सातारा हिल मॅरेथॉन ही सातारा जिल्ह्यातील एक भव्य मॅरेथॉन स्पर्धा म्हणून ओळखली जाते. मोठ्या प्रमाणात स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होतात. राज कोल्हापूरचा असून तो या स्पर्धेत सहभागी झाला होता. पण त्याचा असा अचानकपणे मृत्यू झाल्याने स्पर्धेला एकप्रकारे गालबोट लागल्याचे म्हटले जात आहे.
Join Our WhatsApp Community