राज्यातील मुंबई महापालिका आणि इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. मनसेला या निवडणुकांमध्ये यश मिळवून देण्यासाठी स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता मैदानात उतरले आहेत. राज ठाकरे यांनी विदर्भ दौ-याला सुरुवात केली असून ते सध्या नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी मनसे पदाधिका-यांची बैठक घेत त्यांना पालिका निवडणुकांसाठी कामाला लागा, अशा सूचना केल्या आहेत.
कामाला लागा
नागपूर महापालिका निवडणुकांसाठी अजून तीन महिने आहेत त्यामुळे कामाला लागा. कामात कधीही मागे पडू नका. प्रत्येक जागेवर आपल्याला निवडणूक लढवायची आहे, अशा तयारीने कामाला लागा. लावून धरण्यासारखे अनेक मुद्दे आहेत त्यामुळे त्यासाठी कामे सुरू करा, अशा सूचना राज ठाकरे यांनी नागपूर येथील मनसे पदाधिका-यांना दिल्या आहेत.
दबावाखाली काम करू नका
मुंबई,पुणे यांप्रमाणे उपराजधानीचे शहर असून सुद्धा स्थानिक पातळीवर पक्षाची मोर्चेबांधणी का होत नाही, असा सवालही राज ठाकरे यांनी यावेळी पदाधिका-यांना केला आहे. कोणाच्याही दबावाखाली काम करू नका. आपल्याला पक्ष वाढवायचा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जोमाने कामाला लागा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिका-यांना केले आहे.
Join Our WhatsApp Community