जिथे रस्ता तिथे एसटी या ब्रीदवाक्याप्रमाणे एसटी ही खेड्यापाड्यापर्यंत पोहोचली. प्रवासी आणि एसटी बस वाहतुकीची नाळ अधिक घट्ट करण्यासाठी एसटी महामंडळाने आपली कंबर कसली आहे. लवकरच एसटीच्या ताफ्यात ७०० साध्या गाड्यांसह २००० गाड्या एसटीच्या ताफ्यात सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. तर याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.
(हेही वाचा – मंत्र्यांच्या बंगल्याला गडकिल्ल्यांची नावं, मग संवर्धन का नाही? राज्यभरातील शिवप्रेमी आक्रमक)
एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या १५ हजार ८७७ गाड्या असून त्यापैकी १२ हजार ८२८ साध्या बसेस आहेत. याशिवाय ४२१ हिरकणी, २१७ विना वातानुकूलित तर उर्वरित वातानुकूलित बस, मिडी, मिनी बस आहेत. यासह येत्या काही महिन्यांत साध्या बसची संख्या ही वाढणार आहे. एसटीमध्ये दोन हजार जुन्या गाड्यांची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. आता ७०० बसची ऑर्डर देण्यात आली आहे. त्या लवकरच एसटीच्या ताफ्यात येणार आहे.
गेल्या तीन वर्षात नवीन बसगाड्या खरेदी करण्यात आल्या नाहीत. मात्र आयुर्मान संपुष्टात आलेल्या गाड्या भंगारात काढण्यात येत असल्याने ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याने एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.
Join Our WhatsApp Community