पंजाबमधील मोहाली येथील चंदीगढ विद्यापीठातील MMS प्रकरणात एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. शिमला जिल्हा पोलिसांनी 23 वर्षीय तरुणला ताब्यात घेतले आहे. हिमाचल प्रदेशचे डीजीपी संजय कुंडू यांनी ट्वीट केले की, आम्ही चंदीगड विद्यापीठातील कथित आक्षेपार्ह व्हिडीओ लीक प्रकरणातील आरोपीला पकडले आहे. पंजाब पोलिसांच्या विनंतीवरुन हिमाचल प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
याबाबत माहिती देताना, डीएसपी रुपिंदरदीप कौर यांनी सांगितले की, काल रात्री या प्रकरणात एकला अटक करण्यात आली होती. आम्ही नंतर याप्रकरणी अधिक माहिती जाहीर करु.
( हेही वाचा: आरोग्य विमा घेताय? ‘हे’ लक्षात असू द्या )
काय आहे प्रकरण?
चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थीनींचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्याची बातमी समोर आली होती. यानंतर एमएमएस बनवणा-या तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी या तरुणीविरुद्ध गु्न्हा नोंदवला आहे. आरोपी तरुणी अनेक दिवसांपासून विद्यार्थीनींचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ बनवत होती आणि तिच्या ओळखीच्या तरुणाला पाठवत होती, असा आरोप आहे. या तरुणाने हे व्हिडीओ इंटरनेटवर टाकले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर हे व्हिडीओ व्हायरल झाले. जेव्हा तरुणींनी त्यांचे व्हिडीओ इंटरनेटवर पाहिले तेव्हा त्यांना धक्का बसला. याप्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी रविवारी चौकशीचे आदेश दिले आहेत.
Join Our WhatsApp Community