राज्यात सध्या वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावर आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. या प्रकल्पाच्या वादावर राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणाची चौकशी व्हावी, असे राज ठाकरे म्हणाले.
काय म्हणाले राज ठाकरे
काही दिवसांपासून चर्चेत आलेला विषय वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलवला यावर राज ठाकरेंनी आपले मत व्यक्त केले. यावर ते म्हणाले, जेव्हा एखादा प्रकल्प आपल्याकडे येतो तेव्हा त्यासाठीच्या पायाभूत सुविधा असणे गरजेचे आहे. गुजरातने चांगली ऑफर दिली असेल त्यामुळे हा प्रकल्प गुजरातला गेला असावा. तर औद्योगिक गोष्टींकडे राज्याचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत राज्यात आलेला उद्योग बाहेर गेलाच कसा, याची चौकशी झालीच पाहिजे, असेही ते म्हणाले.
(हेही वाचा – राज ठाकरेंचा मोठा निर्णय! नागपुरातील मनसेची सर्व पदं बरखास्त, ‘या’ दिवशी होणार नवी कार्यकारिणी जाहीर)
राज्यात फक्त उद्योग येत नाही तर त्यासोबत रोजगार निर्मिती होते, भागाचा विकास होतो. महाराष्ट्र मोठा होण्याचे कारणच हे आहे. भारतामध्ये येणाऱ्या उद्योगांची पहिली पसंती महाराष्ट्र असते. यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारते. बाहेरच्या देशातून येणाऱ्या उद्योगांना महाराष्ट्रात येण्यासाठी पहिली पसंती मिळत आहे. हे राज्याचं भाग्य असेल तर तो आपण स्वतःच्या हाताने उद्योग घालवतोय, यासारखं दुसरं दुर्देवं नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community