कोरोना रुग्णसंख्येत सध्या मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत आहे, सोमवारी राज्यातील दैनंदिन नव्या रुग्णसंख्येत निच्चांकी नोंद झाली. सोमवारी राज्यात केवळ २९२ कोरोना रुग्ण सापडले. राज्यात सध्या सक्रिय रुग्णसंख्या ४ हजार ४४० असून येत्या दोन दिवसांत राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारांहून खाली येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
सोमवारी राज्यात केवळ २ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत ३९० कोरोना रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९८.९२ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के पोहोचला आहे. राज्यात कोरोना तपासणीअंती रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे प्रमाण ९.६० टक्क्यांवर आले आहे.
राज्यातील जिल्हानिहाय सक्रीय रुग्णांची संख्या
- मुंबई – १ हजार ९
- पुणे – १ हजार २४२
- ठाणे – ६८३
- रायगड – २९०
- पालघर – ११९