जेवणासाठी केलेले मटण कु्त्र्याने खाल्ले म्हणून झालेल्या वादातून बापाने आपल्या पोटच्या मुलीवर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथे घडली आहे.
रविवारी सायंकाळी वीस वर्षीय विवाहित महिला मृत काजल शिंदे ही तिच्या माहेरी पतीसह राहत होती. रविवारी जेवणासाठी घरात मटण आणून काजलने रस्सा केला होता. मटणाचा रस्सा झाल्यानंतर, ती घरातल्या इतर कामांमध्ये व्यस्त होती. त्याचवेळी एका कुत्र्याने घरात शिरुन ते मटण खाल्ले. हा प्रकार काजलची आई मीरा भोसले हिच्या लक्षात आल्यानंतर, तिने याचा जाब विचारला. यावरुन दोघींमध्ये वादावादी झाली. या दरम्यान दारुच्या नशेत असेलेले काजलचे वडील गणेश भोसले याने खुंटीवर टांगून ठेवलेल्या गावठी बंदूकातून काजलवर गोळी झाडली.
( हेही वाचा: “शिल्लक सेनेच्या ‘टोमणे’ मेळाव्याला मुंबई मनपाने परवानगी द्यावी,महाराष्ट्राला मनोरंजनापासून वंचित ठेवू नये” )
आरोपी फरार, पोलिसांकडून तपास सुरु
वडिलांनी झाडलेली गोळी काजलच्या छातीत लागल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात नेले असता, डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गोळीबारात मृत झालेल्या काजलचे पती मनोज सुनील शिंदे यांनी तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर गणेश भोसले व आई मीरा भोसले यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर आरोपी गणेश भोसले फरार झाला आहे. तर, आई मीरा भोसले हिला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Join Our WhatsApp Community