RSS नेत्याची दुकानात घुसून केली हत्या, पोलिसांकडून PFI नेत्याला अटक

160

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) नेत्याच्या हत्येप्रकरणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या इस्लामिक संघटनेच्या एका नेत्याला अटक करण्यात आली आहे. अबुबकर सिद्दीक असे या आरोपी नेत्याचे नाव असून त्याला केरळच्या पलक्कड जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएफआयचे पलक्कड जिल्हा सचिव अबुबकर सिद्दीक यांना श्रीनिवासन यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तसेच पीएफआय कार्यकर्त्यांच्या गटासह अनेक पक्षांच्या नेत्यांची हिटलिस्ट तयार करण्यात त्याचा सहभाग होता. हे नेते यूथ लीग, इंडियन युनियन मुस्लिम लीग, भाजप आणि सीपीआय (एम) ची युवा शाखा होती, असे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – मुंबई-अहमदाबाद महामार्गावर डिव्हायडर तोडून टेम्पोवर धडकली कार, तिघांचा जागीच मृत्यू)

मिळालेल्या माहितीनुसार, १६ एप्रिल रोजी श्री निवासन नावाच्या आरएसएस नेत्याची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर एका दिवसापूर्वी सुबैर नावाच्या पीएफआय कर्मचाऱ्याच्या हत्येता बदला म्हणून हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांना आहे. अबुबकर सिद्दिकीच्या अटकेवर, सीपीआय (एम) च्या नेतृत्वाखालील पीएफआयच्या एलडीएफ सरकारवर राज्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांचा छळ केल्याचा आणि त्यांना खोट्या खटल्यांमध्ये अडकवल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण

या दोन्ही प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन केले होते. याप्रकरणी पीएफआयशी संबंधित २० हून अधिकांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. श्रीनिवासन या आरएसएस नेत्यावर १६ एप्रिल रोजी मेलमुरी येथील त्यांच्या मोटारसायकल दुकानात सहा जणांनी घुसून हल्ला केला होता. यानतंर २४ तासात जिल्ह्यातील एलापल्ली येथे सुबैर यांची हत्या करण्यात आली होती. तर देशातील अनेक प्रकारच्या हिंसक कारवायांमध्ये पीएफआय सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.