पत्राचाळ घोटाळ्यात ईडीच्या आरोपपत्रात माजी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख असल्याचे समोर आले आहे. आता या आरोपपत्रानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता याच आरोपपत्रावर बोट ठेवत भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत शरद पवारांची या पत्राचाळ प्रकरणात तत्काळ चौकशी करण्याची विनंती सरकारकडे केली आहे.
भातखळकरांचे ट्वीट
अतुल भातखळकर यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, पत्राचाळीच्या भ्रष्टाचाराचा आवाका पाहता हे प्रकरण फक्त संजय राऊत यांनी झेपणारे आहे, असे सुरुवातीपासून वाटत नव्हते. बड्या सत्ताधारी राजकारण्यांचा वरदहस्त असल्याशिवाय हा भ्रष्टाचार अशक्य होता. ईडीच्या आरोपपत्रात जे नाव आहे ते one and only one शरद पवार. याप्रकरणी तत्काळ चौकशी व्हावी, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.
( हेही वाचा: काँग्रेसच्या महत्त्वाच्या बैठकीला वरिष्ठ नेत्यांची दांडी )
पत्राचाळीच्या भ्रष्टाचाराचा आवाका पाहाता हे प्रकरण फक्त संजय राऊत यांना झेपणारे आहे असे सुरुवातीपासून वाटत नव्हते. बड्या सत्ताधारी राजकारण्यांचा वरदहस्त असल्याशिवाय हा भ्रष्टाचार अशक्य होता. ED च्या आरोपपत्रात हे नाव आहे.
One and only one शरद पवार. याप्रकरणी तत्काळ चौकशी व्हावी. pic.twitter.com/JwqdhPVN6E— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 20, 2022
ईडीच्या आरोपपत्रात काय?
पत्राचाळ घोटाळा प्रकरणात अनेक खुलासे होत आहेत. आरोपपत्रानुसार, 2006-2007 या काळात एका तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री आणि एक माजी मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीनंतर गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून राकेश वाधवान यांना पत्राचाळीचा विकास करण्यासाठी आणण्यात आले होते. त्यानंतर यामध्ये 1 हजार 34 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे ईडीने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे.
तसेच, या प्रकरणात ज्या काही घडामोडी घडत होत्या त्यासंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांना माहिती होती, असे देखील सांगण्यात आले आहे. मात्र, तो माजी मुख्यमंत्री कोण होता ज्याच्या नेतृत्वाखाली बैठक झाली,त्याचा उल्लेख मात्र ईडीने आरोपपत्रात केलेला नाही. त्यामुळे आता तो माजी मुख्यमंत्री कोण याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
Join Our WhatsApp Community