पत्राचाळ घोटाळा प्रकरणात सध्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहेत. 19 सप्टेंबरला झालेल्या सुनावणीत राऊतांच्या ईडी कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ करण्यात आली. त्यातच आता पत्राचाळ प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राऊतांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
काय म्हणाल्या स्वप्ना पाटकर?
मिळालेल्या माहितीनुसार, पत्राचाळ प्रकरणात स्वप्ना पाटकर यांनी मोठा दावा केला आहे. घोटाळ्यातील पैसे संजय राऊत यांनी बनावट कंपन्यांत वळवले असल्याचा दावा पाटकरांनी केला. तसेच संजय राऊत यांनी राऊतर्स एंटरटेन्मेंट एलएलपी नावाची कंपनी स्थापन केली. त्याद्वारे त्यांनी ठाकरे या चित्रपटाची निर्मिती केली. त्या प्रकल्पात त्यांनी आपले बेहिशेबी पैसे वळवले. एप्रिल-2021 मध्ये मद्य व्यवसायाच्या एका कंपनीतही त्यांचे स्वारस्य होते. अलीकडच्या काळात कुटुंबीयांच्या नावे बनावट कंपन्या सुरु करुनही त्यात बहिशेबी पैसे वळवणे त्यांनी सुरु केले होते, असा दावा पाटकर यांनी जबाबात केला आहे.
( हेही वाचा: भगवे कपडे न घालण्यामागचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले कारण, म्हणाले… )
Join Our WhatsApp Community