नांदेडमध्ये आश्रमशाळेतील ४० ते ५० विद्यार्थ्यांना विषबाधा

170

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील जलधारा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील 516 पैकी 40-50 विद्यार्थ्यांना मंगळवारी विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना घडल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना जलधरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यातील 11 विद्यार्थ्यांना हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात तर चौघांना नांदेड जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मुरमुरे यांनी दिली आहे.

(हेही वाचा – कॉमेडियन स्टार राजू श्रीवास्तव यांचं निधन, वयाच्या 58 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

मिळालेल्या माहितीनुसार, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले होते. त्यातील जेवणात वांग्याची भाजी होती. या भाजीमुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. भाजी खाल्यावर काहींना मळमळ, उलट्यांचा त्रास सुरू झाला. शिक्षक, मुख्यध्यापकांनी विद्यार्थ्यांना जलधारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे समजताच आमदार भीमराव केराम यांनी रूग्णवाहिकेची व्यवस्था केली. त्यानंतर उपचार केल्यावर विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली असल्याचे सांगितले जात आहे. या आश्रमशाळेतून देण्यात आलेल्या माहितीनुसार, विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यामध्ये चांदणी मेंडके, जयश्री डुडुळे, काजल तांबारे, सविता पिंपळे, दिव्या ढोले, वैष्णवी मिराशे, वंदना डुकरे, श्रद्धा शेळके, ओमसाई ढोले, दिव्या मेंडके यांचा समावेश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.