पुणेकरांनो! ‘या’ दिवशी राहणार शहरातील CNG पंप बंद

140

तुम्ही पुणे शहरात राहत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण पुण्यातील सीएनजी पंप १ ऑक्टोबर रोजी बंद राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या दिवशी पुण्यातील सीएनजीवर असणाऱ्या वाहनचालकांना मोठा फटका बसणार आहे. कारण पुण्यात सीएनजीवर मोठ्या प्रमाणात वाहने चालतात.

दरम्यान, पुण्यातील टॉरेंट गॅस पंपावर १ ऑक्टोबर रोजी सीएनजीची विक्री होणार नसल्याचे सांगितले जात आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार, सीएनजीच्या ट्रेड डीलर मार्जिनमध्ये वाढ व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पुणे शहरात ६० पेक्षा अधिक सीएनजी पंप आहेत. तर सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची संख्यादेखील तितकीच आहे. मात्र १ ऑक्टोबर रोजी सीएनजी पंप बंद राहणार असल्याने पुणेकरांची मोठी गैरसोय होणार आहे.

(हेही वाचा – कॉमेडियन स्टार राजू श्रीवास्तव यांचं निधन, वयाच्या 58 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

यासह महापालिकेने सीएनजीवरील पीएमपीएलच्या बसही आणलेल्या आहेत. त्यामुळे पीएमपीएल वाहतुकीवरही याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.