सध्या उद्धव गट आणि शिंदे गट यांच्यातील सत्ता संघर्ष हा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर २७ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. ही सुनावणी लाईव्ह दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे समजते.
सर्व घडामोडी पारदर्शक करण्याचा प्रयत्न
सुरुवातीला हे लाईव्ह टेलिकास्ट युट्युबवरून होईल नंतर न्यायालय स्वतःचे लाईव्ह स्ट्रीमिंग विकसित करणार असल्याचे समजते. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे देशभरातील राजकीय पक्षांना या सुनावणीमुळे विशेष फायदा होणार आहे. सध्या शिवसेना कुणाची हा वाद जोर धरत आहे. न्यायालयात उद्धव गट आणि शिंदे गट यांच्या याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यासाठी मुख्य न्यायमूर्ती लळीत यांनी ५ न्यायमूर्तींचे खंडपीठ स्थापन केले. मात्र मधल्या काळात न्या. लळीत यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्कार केला, त्यानंतर टीकाटिपण्णी सुरु झाली. त्यावर न्यायमूर्ती लळीत यांनी सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेऊन यातील सर्व घडामोडी पारदर्शक करण्याचा हेतू साध्य केला असावा, अशी शक्यता आता व्यक्त होऊ लागली आहे.
Join Our WhatsApp Community