राज्यातील सत्ता बदल झाल्यानंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांची बदली होईल असे बोलले जात असले तरी पुढील सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत तरी या दोन्ही अधिकाऱ्यांची बदली करण्यात येणार नाही. या दोन्ही अधिकाऱ्यांची महापालिकेतील खुंटी अधिक मजबूत झाल्याचे पहायला मिळत आहे.
( हेही वाचा : गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना घरचा अहेर, मेळाव्यात उपस्थित राहून केले शिंदेंच्या भूमिकेचे समर्थन )
राज्यात यापूर्वीच्या महाविकास सरकारमधील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा प्रभाव मुंबई महापालिकेतील कामकाजावर होता. महापालिकेत शिवसेनेची सत्ता असल्याने या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आयुक्तांना विश्वासात घेऊन काम करत होते.त्यामुळे आयुक्तही, पुढे या मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री यांचा डोक्यावर हात असल्याने आयुक्तही महापालिकेतील महापौर, स्थायी समिती अध्यक्ष तसेच सभागृहनेत्या यांना विचारात न घेताच काम करत होते. त्यामुळे महापालिकेचे कामकाज केवळ सरकारच्या इशाऱ्यानुसारच कामकाज केले जात असल्याने एकप्रकारे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्यावर सरकारचा प्रभाव होता. त्यामुळे यापूर्वीच्या सरकारमधील मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री यांचा प्रभाव असलेल्या या अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर होईल अशी हवा निर्माण झाली आहे.
दोन महिन्यांपूर्वी ठाकरे सरकार जावून शिंदे-फडणवीस यांचे सरकार येताच या दोन्ही अधिकाऱ्यांची बदली होणार अशी चर्चा असली तरी नवीन सरकारसोबत या दोन्ही अधिकाऱ्यांनी जुळवून घेतले आहे. ठाकरे सरकार पेक्षा शिंदे सरकारच्याही अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न दोन्ही अधिकाऱ्यांनी केला असून तुर्तास तरी या दोन्ही अधिकाऱ्यांना महापालिकेतून बदली करण्याचा विचार सरकारचा दिसत नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अभिप्रेत असे विकास प्रकल्प राबवण्यासाठी चहल आणि वेलरासू हे विशेष मेहनत घेत असून त्यामुळे येत्या डिसेंबरपर्यंत विकासकामे आणि विकास प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार महापालिका आयुक्त आणि त्यांची टीम करत आहे. त्यामुळे महापालिकेची निवडणुकीपर्यंत या आयुक्त व अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांची बदली होणार नसून तोपर्यंत त्यांची महापालिकेतील खुंटी मजबूत झाल्याचे बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community