संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या 1 किलोमीटर परिसरातील बांधकामावर घातलेली मर्यादा उठण्याची चिन्हे आहेत. बुधवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पार पडलेल्या कार्यक्रमात खासदार गोपाळ शेट्टी यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बांधकाम क्षेत्रवरील बंदी उठवण्याची मागणी केली. त्यावर बैठकीच्या माध्यमातून समसयेचे निराकरण करू, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बुधवारी सायंकाळी उद्यानातील टेक्सीडर्मी केंद्र, केट ओरिएंटेंशन सेंटर आणि पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम वनमंत्री सुधीर मुंगुटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रम विभागाचे माजी कार्यकारी अधिकारी एरिक सोलेम, आमदार प्रवीण दरेकर आणि खासदार गोपाळ शेट्टी उपस्थित होते. दुसऱ्या टर्ममध्ये वनमंत्री पद भूषविताना सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनेत्री रविना टंडन यांना वनविभागाच्या सदिच्छादूत एमबेसिडर म्हणून घोषित करण्यात आले.
(हेही वाचा उद्धव ठाकरेंच्या सभेमुळे पश्चिम द्रुतगती महार्गावर तुफान वाहतूक कोंडी)
यावेळी आमदार प्रवीण दरेकर यांनी उद्यानात तातडीने वनग्रंथालय, पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार आदी मागण्या केल्या. तर खासदार गोपाळ शेट्टी यांनी उद्यानाला लागून असलेल्या एक किलोमीटर परिसरातील अगोदरपासून प्रस्तावित असलेल्या बांधकामांना बंदीतून वगळण्याची मागणी केली. या मागाण्यांवर चर्चा करण्यासाठी 10 ऑक्टोबर रोजी खास बैठक घेतली जाईल अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
अशी पाखरे येती….
कार्यक्रम निश्चित वेळेपासून दीड तास उशिरा सुरु झाला. हा कार्यक्रम दुपारी साडेचार वाजता सुरु होणे अपेक्षित असताना सायंकाळी सहानंतर जंगलातील पर्यटन क्षेत्रात हा कार्यक्रम पार पडला. विजेच्या दिव्यांना आकार्षून पाखरांचे थवेच्या थवे कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेत आणि पाऊस तास वनमंत्र्यांसह सर्वच हैराण झालेत. अखेर पाऊण तासांनी पाखरे येणे बंद झाले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
(हेही वाचा माझ्याशिवाय चांगला हिशेब कुणाकडे असणार, सगळे सांगणार! एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा)
८ वन्यजीव रुग्णवाहिका कार्यान्वित
राज्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, डहाणू, ठाणे, अलिबाग, रोहा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे आजपासून ८ वन्यजीव रुग्णवाहिका कार्यान्वित करण्यात आल्या असून आज त्याचे लोकार्पण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. याशिवाय ५० वनपाल आणि वनरक्षकासाठी देण्यात आल्या. ही सर्व वाहने अत्याधुनिक, सुसज्ज आणि गतिमान असणार आहेत.
वन संवर्धनासाठी आराखडा
ज्याप्रमाणे शहरांच्या विकासासाठी विकास आराखडा असतो त्याच प्रमाणे वन विभागामार्फत वन संरक्षण व संवर्धनासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे. याची औपचारिक घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली
Join Our WhatsApp Community