टीव्ही वाहिन्यांवरील वादविवाद कार्यक्रमांमध्ये वापरल्या जाणा-या द्वेषपूर्ण भाषणांबाबत सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नापसंती व्यक्त केली. टीव्हीवर होणा-या वादविवाद कार्यक्रमांमध्ये एखाद्या समाजाविषयी द्वेष पसरवले जाते. पण हा क्षुल्लक मुद्दा आहे, असे समजून सरकार याकडे दुर्लक्ष करते . हे चुकीचे असल्याचे म्हणत न्यायालयाने केंद्र सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
वृत्तवाहिन्यांवरील द्वेषोक्तीपूर्ण भाषेसंदर्भात दाखल झालेल्या याचिकांवर न्यायमूर्ती के.एम जोसेफ आणि न्यायमूर्ती ह्रषिकेश राॅय यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी झाली. यावेळी विधी आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार कायदा आणण्याचा विचार आहे का? अशी विचारणा करताना कायदा अस्तित्वात येत नाही, तोपर्यंत मार्गदर्शक तत्वे आखून देण्याबाबत सुतोवाचही न्यायालयाने केले.
( हेही वाचा: शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यासंदर्भातील सुनावणी पुढे ढकलली, उच्च न्यायालयात या दिवशी होणार निर्णय )
काय म्हणाले न्यायालय?
टीव्ही वाहिन्यांवर दाखवली गेलेली कृती आणि संवादकांचा आविर्भाव सर्वजण पाहत असतात. टीव्हीवर दाखवल्या जाणा-या कार्यक्रमांचा सर्वसामान्यांवर मोठा प्रभाव पडतो.
द्वेषामुळे टीआरपी वाढतो आणि त्यामुळे नफा वाढतो. त्यामुळेच या द्वेषोक्तीला केला जाणारा दंडही नगण्य असतो. त्यांच्या खिशावर त्याचा जराही परिणाम होत नाही- न्यायमूर्ती ह्रषिकेश राॅय