‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी गरबा उत्सवात मुसलमानांना प्रवेश देण्यास विरोध

175

जे हिंदु धर्मातील रूढी, परंपरा आणि देवीदेवता यांना मानत नाहीत, उलट आमच्या देवीदेवतांना घृणास्पद नजरेने पाहतात. त्यांचे मौलाना नवरात्रीत मुसलमानांना प्रवेश हवा, अशा बाता मारतात. नवरात्रीत गरबा उत्सवात मुसलमानांना प्रवेश नको,  कारण नवरात्रीत गरबा उत्सवात हिंदु मुलींना फूस लावून ‘लव्ह जिहाद’च्या अनेक घटना भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभर घडल्या आहेत, असे एकमत हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजित ‘नवरात्रीत लव्ह जिहाद?’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात झाले.

लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा हवा

वर्ष 1995 पासून यु.के.मधील ब्रैडफोर्ड (लीड्स) येथे हिंदू मुलींना फूस लावून ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात आणण्यासाठी ‘इस्लामिक हिट टीम्स’ कार्यरत होत्या. केरळ उच्च न्यायालयानेही ‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात असल्याचे स्पष्ट केले आहे. लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा हवा, अशी मागणी ‘संगम टॉक्स’च्या संपादिका तान्या यांनी केली. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘नवरात्रीत लव्ह जिहाद ?’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात त्या बोलत होत्या. सिंह वाहिनीच्या संस्थापिका पुष्पा पाल ‘लव्ह जिहाद’ विषयी आपले अनुभवकथन करताना म्हणाल्या की, जे म्हणतात ‘लव्ह जिहाद’ नाही, त्यांना मी सांगते की, ‘लव्ह जिहाद’ला मी स्वतः बळी पडली होते. हा एक ‘जिहाद’ आहे, हे पटकन लक्षात येत नाही. ‘लव्ह जिहाद’ हा प्रेमासाठी नसून मुसलमानांची लोकसंख्या वाढवणे आणि हिंदु युवतींचे धर्मांतर करणे, यासाठीच योजनाबद्ध पद्धतीने केला जातो. त्यामुळे हिंदु युवती, महिला यांनी धर्मशिक्षण घेऊन आता सजग राहणे आवश्यक आहे.

(हेही वाचा मध्य प्रदेशात ‘Thank God’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी)

अनेक मुसलमान युवक गरब्यात सहभागी होतात

हिंदु जनजागृती समितीच्या ‘रणरागिणी’ शाखेच्या प्रतीक्षा कोरगावकर म्हणाल्या की, नवरात्रीत विविध ठिकाणी गरबा खेळण्याचे निमित्त करुन अनेक मुसलमान युवक गरब्यात सहभागी होतात आणि यात सहभागी हिंदु युवतींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवतात. मग त्या ‘लव्ह जिहाद’ची शिकार होतात. गेल्या काही महिन्यांत 14 ते 18 या वयोगटातील अल्पवयीन मुली ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्या आहेत, अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. ‘लव्ह जिहाद’ विषयी हिंदु जनजागृती समिती गेली अनेक वर्षे जागृती करत आहे. समितीने याविषयी ग्रंथही प्रकाशित केला आहे. व्याख्याने आणि विविध उपक्रमांतून ‘लव्ह जिहाद’च्या समस्येला वाचा फोडून याविषयी सतर्क राहण्याचे आवाहन हिंदु जनजागृती समिती करत असते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.