सरवणकर आणि ठाकरे गटात पुन्हा एकदा हाणामारी होता होता राहिली, काय झाले नेमके

163

शिवसेनेच्या शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून सध्या राज्यातील वातावरण तापले आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटात सध्या यावरून जंगी सामना रंगला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. त्याचीच पुनरावृत्ती गुरुवारी होता होता राहिली.

काय झाले नेमके?

गुरुवारी रात्री दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर माहीम येथे शिंदे समर्थकांची बैठक होती. या बैठकीला आमदार सदा सरवणकर देखील उपस्थित होते. बैठकीनंतर आमदार सदा सरवणकर बाहेर आले तेव्हा ठाकरे गटाचे समर्थक शिवसेना शाखेसमोर उभे होते. यावेळी सरवणकर आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. हा वाद हाणामारीत परावर्तित होणार असे वाटत असतानाच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे वाद टळला.

दोन्ही गटांमध्ये राडेबाजी

अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत शिंदे समर्थक आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली होती. यानंतर 10 सप्टेंबर रोजी मध्यरात्री शिंदे गटाचे दादर येथील आमदार सदा सरवणकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि ठाकरे समर्थकांमध्ये हाणामारी झाली. यावेळी सरवणकर यांनी आपल्या पिस्तुलातून गोळ्या झाडल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.