थंडी आणि सतत पाऊस सुरु असल्याने मुंबईकरांची शुक्रवारची सकाळ हुडहुडी भरवणारी ठरली. मुंबईत किमान तापमान २२.४ अंश सेल्सिअसवर घसरले. शुक्रवारचा २२.४ अंश सेल्सिअसवर नोंदवलेले किमान तापमान सप्टेंबर महिन्यातील गेल्या सहा वर्षांतील सर्वात कमी किमान तापमान होते. याअगोदर २०१६ साली २१ सप्टेंबरला २२ अंश सेल्सिअसवर किमान पारा घसरला होता.
(हेही वाचा – आदित्य सेनेच्या ‘टक्केवारी’मुळेच मराठी माणूस मुंबईतून हद्दपार; नितेश राणेंचा हल्लाबोल)
सकाळचे कोवळे ऊन आणि गारव्याचा अलगद स्पर्शासह मुंबईकरांची सकाळ सुरु झाली. रात्रीची हुडहुडणारी थंडी काहीशी कमी झाल्याचा अनुभव येत असला तरीही रात्रभर सुरु असलेल्या गारव्याने किमान तापमानात घट केली. काही दिवसांपासून हलक्या सरींसह मुंबईकरांचा दिवस सुरु आहे. कोवळ सूर्यप्रकाश आणि ढगाळ वातावरणासह असा मुंबईकरांचा दिवस सुरु आहे. या वातावरणात फारसा काही बदल होणार नाही. त्यामुळे सायंकाळी कमाल तापमानही कमीच नोंदवले जाईल, अशी माहिती वेधशाळा अधिका-यांनी दिली.
तर गुरुवारी २५.१ अंश सेल्सिअसवर नोंदवलेले कमाल तापमानही सरासरीच्या तुलनेत सहा अंशाने कमी होते. शुक्रवारीही कमाल तापमान २६ अंश सेल्सिअसवर राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. शहरांत आणि उपनगरांत हलका पाऊस राहील, असाही अंदाज आहे.
Join Our WhatsApp Community