मुंबईतील जे.जे. रुग्णालयात परिचर्या महाविद्यालय व परिचर्या विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथे दिनांक १७ सप्टेंबर २०२२ ते २३ सप्टेंबर २०२२ या कालावधीमध्ये सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
( हेही वाचा : भारतीय रेल्वेद्वारे डिजिटल इंडियाला प्रोत्साहन; 310 रेल्वे स्थानकांवर ई-कॅटरिंग सेवा)
या सेवा सप्ताहामध्ये मॅरथॉन, अवयवदान जनजागृती अभियान, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि रक्तदार शिबिर हे कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. परिचर्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व ज. जी. समूह रुग्णालयाच्या परिचारिकांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला. सेवा सप्ताहानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धामधील विजेत्यांना पारितोषिक व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आहे. हा कार्यक्रम कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अधिष्ठाता, डॉ. पल्लवी सापळे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय सुरासे, प्राचार्या डॉ. अपर्णा संखे, समन्वयक श्रीमती हेमलता गजबे, सहाय्यक अधिसेविका माने यांचे मार्गदर्शन तसेच सर्व शिक्षकवृंद, सर्व परिचारिका संवर्ग व विद्यार्थी प्रतिनिधी उमेश देवकाते, आदित्य शामकुवर व प्रियांक टेकाळेसह सर्व विद्यार्थ्यांचे योगदान लाभले.
Join Our WhatsApp Community