मुंबईकरांनो सावधान… तुम्ही मुंबईत राहत असाल किंवा वावरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण मुंबईला बॉम्बने उडवण्याची निनावी धमकी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सांताक्रूझ येथील एका नागरिकाला व्हिडिओ कॉल करून एका अज्ञाताने मुंबईला बॉम्बने उडवण्यची धमकी दिली आहे. याप्रकरणी सांताक्रूझ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचा – रूपी बँकेनंतर आणखी एका बँकेवर RBI ची कारवाई! तुमचं ‘या’ बँकेत खातं तर नाही ना?)
सांताक्रूझ येथील एका नागरिकाला एका व्यक्तीकडून व्हिडिओ कॉल आला. यावेळी या व्यक्तीला मुंबईला बॉम्बने उडवणार असल्याची धमकी दिली आहे. त्यानंतर या नागरिकाने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अधिक तपास सुरू असून हा कॉल कुठून आला याचा सखोल शोध घेतला जात आहे.
विशेष म्हणजे यापूर्वीही अनेकदा कॉल करून मुंबई उडवण्याच्या धमक्या दिल्याचे समोर आले होते. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना पोलिसांनी मुंबईकरांना दिल्या होत्या. तर सामान्य व्यक्तिला व्हिडिओ कॉल करून धमकी दिल्याची ही पहिलीच वेळ नसल्याचे सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community