आता ट्रेन सुटण्याआधी तिकीट रद्द केले तरीही मिळेल Refund, IRCTC ने सांगितला ‘हा’ मार्ग

146

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतात दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात, त्यामुळे रेल्वेशी संबंधित सगळ्या अपडेट्सची माहिती असणे आवश्यक आहे. अनेकवेळा काही आपत्कालीन परिस्थितीमुळे ट्रेनचा चार्ट तयार केल्यानंतर तुम्हाला ट्रेनचे तिकीट रद्द करावे लागते. पण अशा परिस्थितीतही, तुम्हाला तिकीट रद्द केल्याचा परतावा मिळेल.

( हेही वाचा : पुणे महापालिका भरती; ‘या’ दिवशी घेण्यात येणार परीक्षा)

IRCTC ने दिली माहिती

IRCTCने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, भारतीय रेल्वेने प्रवाशांनी नियोजित वेळेत प्रवास केला नाही किंवा अर्धवट प्रवास केल्यास रद्द केलेल्या तिकीटाचा परतावा देण्यात येतो. यासाठी तुम्हाला रेल्वेच्या नियमांनुसार तिकीट जमा पावती (टीडीआर) भरावी लागेल.

ऑनलाइन टीडीआर कसा दाखल करावा

  • यासाठी तुम्ही प्रथम IRCTC च्या अधिकृत वेबसाइट www.irctc.co.in वर जा.
  • आता होम पेजवर जाऊन My Account वर क्लिक करा.
  • आता ड्रॉप डाउन मेनूवर जाऊन My transaction वर क्लिक करा.
  • येथे तुम्ही फाइल टीडीआर पर्यायातील एक पर्याय निवडून फाइल टीडीआर करू शकता.
  • आता तुम्हाला त्या व्यक्तीची माहिती दिसेल ज्याच्या नावावर तिकीट बुक केले आहे.
  • आता येथे तुम्ही तुमचा पीएनआर क्रमांक, ट्रेन क्रमांक आणि कॅप्चा भरा आणि रद्द करण्याच्या नियमांच्या बॉक्सवर टिक करा.
  • आता तुम्ही सबमिट बटणावर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला बुकिंगच्या वेळी फॉर्ममध्ये दिलेल्या नंबरवर एक ओटीपी मिळेल.
  • येथे OTP टाकल्यानंतर सबमिटवर क्लिक करा.
  • PNR डिटेल्स व्हेरिफाय करून कॅन्सल तिकीट पर्यायवर क्लिक करा.
  • येथे तुम्हाला पृष्ठावर refund ची रक्कम दिसेल.
  • बुकिंग फॉर्मवर दिलेल्या नंबरवर, तुम्हाला PNR आणि रिफंड बद्दल सविस्त माहिती असलेला कन्फर्मेशन मेसेज मिळेल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.