न्यायदेवतेवरचा विश्वास सार्थ ठरला, हा लोकशाहीचा विजय – उद्धव ठाकरे

173
प्रत्येकवेळा आपण वाईट विचार करु नये. आता चांगली सुरुवात झाली आहे. विजयादशमीचा पहिला मेळावा मला आठवत आहे. तीच परंपरा घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. मधला कोरोनाचा काळ गेला तर कधी आम्ही मेळावा चुकवलेला नाही. ती परंपरा आम्ही चालवतोय. प्रतिष्ठेचा प्रश्न त्यांनी निर्माण केला. न्यायदेवतेवरचा विश्वास सार्थ ठरला आणि हा लोकशाहीचा विजय आहे. सर्वोच्च न्यायालयात जो वाद सुरु आहे त्याचा निकाल केवळ शिवसेनेचे भविष्य ठरवणारा राहणार नाही तर आपल्या देशाच्या लोकशाहीचे भवितव्य ठरवणारे राहणार आहे. त्यामुळे देशात लोकशाही किती काळ राहील? याकडे जगाचे लक्ष आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.

वारस्याला गालबोट लावू नका

६६ वर्षांपासून आमचा विजया दशमीचा मेळावा होतो. न्यायदेवतेने विश्वास सार्थ ठरवला. माझ्या सर्व शिवसैनिकांना आवाहन, उत्साहाने, वाजत गाजत या, पण शिस्तीने या…आपल्या तेजस्वी परंपरेला, वारस्याला गालबोट लावू नका. इतर काय करतील त्याची कल्पना नाही, पण आपली परंपरा जपा. तेजाच्या वारस्याला गालबोट लागेल असे कृत्य आपल्याकडून होऊ देऊ नका. दसरा मेळाव्याकडे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशासह जगभरातील मराठी माणसाचे लक्ष असते. त्यामुळे उत्साहात या, वाजत गाजत या, पण कुठेही गालबोट लागणार नाही याची खबरदारी घ्या, असे आवाहन शिवसेना  उद्धव ठाकरे यांनी केले. इतर काय करतील, त्यांचा आपल्याला माहीत नाही. पण आपली परंपरा आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या परंपरेचे प्रतिनिधीत्व करत आहोत.  या दसऱ्या मेळाव्याकडे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे आणि जगात राहणाऱ्या बांधवांचे लक्ष लागले आहे. आजच्या निकालाकडेही त्यांचे लक्ष लागले होते. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, उत्साहात या, वाजत गाजत या…पण शिस्तीने या… कुठेही आपल्या पंरपरेला गालबोट लागेल असे वागू नका, होऊ देऊ नका, असे उद्धव ठाकरे म्हणाले. दोन गट नाही, शिवसेना ही शिवसेनाच आहे. ती वाढली आहे. परवचा मेळावा हा मुंबईतल्या गटप्रमुखांचा होता. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोर्टाने राज्य सरकारला बजावली आहे. त्यामुळे राज्य सरकारने कायदा सुव्यवस्था राखावी, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.