नवरात्रौत्सवादरम्यान शहरात रात्रीच्या वेळेत गरबा व देवी दर्शनासाठी जाणा-या नागरिकांसाठी बेस्ट उपक्रमाद्वारे शहरात खुली दुमजली (Open Deck) आणि वातानुकूलित हो हो एकमजली (AC Bus) बससेवा दिनांक २६ सप्टेंबर ते दिनांक ४ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत सायंकाळपासून ते मध्यरात्रीपर्यंत किंवा वाहतूक बंद होईपर्यंत चालविली जाणार आहे.
( हेही वाचा : नवरात्रीसाठी मुंबईकरांना ‘बेस्ट’ गिफ्ट! २६ अतिरिक्त बसगाड्या धावणार)
हॉप ऑन हॉप ऑफ ही खुली दुमजली बससेवा ( Open Deck Bus )
हॉप ऑन हॉप ऑफ ही खुली दुमजली बससेवा गेट वे ऑफ इंडिया आणि जुहू बीच दरम्यान मार्गे महर्षि कर्वे रोड, ताडदेव, हाजीअली वरळी सी फेस बाधा एस. व्ही. रोड, लिंकिंग रोड, जुहू तारा रोड ते जुहू बीच या मार्गावर चालविण्यात येणार आहेत.
एसी बससेवा
तसेच वातानुकूलित बसेस जुहू बीच आणि गोराई आगार दरम्यान मार्गे जुहू, बस स्थानक, मिठीबाई कॉलेज, जे. व्ही. पी. डी., न्यू लिंक रोड, मीठ चौकी, आर्लेम चर्च, एस. व्ही. रोड, बोरीवली स्थानक ते गोराई आगार या मार्गावर चालविण्यात येणार आहे.
नवरात्रौत्सवाच्या कालावधीदरम्यान खुल्या दुमजली बससेवेचे प्रवासभाडे रुपये १५०/- आणि वातानुकूलित एकमजली बससेवेचे प्रवासभाडे रुपये ६०/- असेल. सर्व भाविकांनी या बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन बेस्ट उपक्रमाकडून करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community