मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे. तसेच महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्येही नाराजीचा सूर ऐकू येत आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर स्पष्ट मत मांडले नाही, मात्र राज्यात मध्यावधी निवडणूक होणार नाही असे वक्तव्य केले, त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील ११ कोटी जनतेच्या भावना बोलून दाखवल्या असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार ५ वर्षे पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी, संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मुलखातीचा राजकीय अर्थ काढण्याचे कारण नाही. संजय राऊत यांनी माझी मुलाखत घेतली होती. त्यावेळीच त्यांनी इतर पक्षांच्या नेत्याच्या मुलाखती घेणार असे जाहीर केले होते. तसेच राज्यात मध्यावधी निवडणूक होण्याचीही शक्यता नाही, असे म्हटले.
सरकार ५ वर्षांचा कालावधी पूर्ण करणार – संजय राऊत
भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी राज्यात मध्यावधी निवडणूक होणार नाही असे म्हटले आहे, त्यांनी राज्यातील ११ कोटी जनतेच्या भावनाच बोलून दाखवल्या आहेत. ते बोलले आहेत. निवडणुकांवर बोलण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाचा असतो. महाराष्ट्राचे उध्द्वव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार ५ वर्षांचा कालावधि पूर्ण करणार, यावर सर्वांचे एकमत आहे, भाजपनेही हेच मत आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.
मध्यावधी निवडणूक होणार नाही – चंद्रकांत पाटील
संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे राज्यात राजकीय भूकंप होईल अशी शक्यता वाटत नाही. या भेटीचा दुसरा अर्थ काढता येत नाही. तसेच राज्यात कोणत्याच राजकीय पक्षाला मध्यावधी निवडणूक नको आहे. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणूक होणार नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.
फडणवीस – राऊत भेट राजकीय नाही – शरद पवार
राजकीय राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले, संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मुलखातीचा राजकीय अर्थ काढण्याचे कारण नाही. संजय राऊत यांनी माझी मुलाखत घेतली होती. त्यावेळीच त्यांनी इतर पक्षांच्या नेत्याच्या मुलाखती घेणार असे जाहीर केले होते. त्यामुळे त्यांच्या या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याचे कारण नाही.
Join Our WhatsApp Community