तब्बल ३६ तासांनी मुंबई-गोवा महामार्ग सुरू; अपघातग्रस्त टॅंकरमधील गॅस काढण्यात यश

169

या वीकेंडला कोकणात जाणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला असून लांजा येथे उलटलेल्या टॅंकरमधील गॅस काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे तब्बल ३६ तासांनंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे. गॅस टॅंकरच्या अपघातामुळे अंजनारी पुलावरील वाहतूक गुरूवारपासून ठप्प होती. पर्यायी मार्गाने ही वाहतूक वळवण्यात आली होती. अखेर आता पुन्हा वाहतूक पूर्वपदावर आली आहे.

( हेही वाचा : मध्य रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षेविना होणार निवड, ‘या’ ठिकाणी द्या थेट मुलाखत)

३६ तासांनी वाहतूक पूर्वपदावर

एलपीजीची वाहतूक करणारा टॅंकर अंजनारी पुलावरून नदीत कोसळला. या टॅंकरमध्ये १८ मॅट्रिक टन इतका गॅस होता. संभाव्य धोका लक्षात घेऊन महामार्गावरील वाहतूक तात्काळ रोखण्यात येऊन पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती. अखेर शनिवारी या टॅंकरमधील गॅस शिफ्टिंगचे काम पूर्ण होऊन ३६ तासांनी वाहतूक सुरू झाली आहे.

हा गॅस काढण्यासाठी महामार्गावर पथकही तैनात करण्यात आले होते. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर ही प्रक्रिया पूर्ण झाली असून महामार्गावरील प्रवास सुरू झालेला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.