पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान PFI ने रचला होता हल्ला करण्याचा कट? ईडीचा दावा

145

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुलै २०२२ च्या पाटण्यातील रॅलीला लक्ष्य करण्यात आले होते. तसेच उत्तप्रदेशमधील संवेदनशील ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी दहशतवाही मॉड्यूलसह PFI संघटना हल्ला करण्याच्या तयारीत होती असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे.

ईडीने केला दावा 

इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींच्या पाटणा दौऱ्यावर हल्ला करण्यासाठी पीएफआयने १२ जुलै २०२२ रोजी प्रशिक्षण शिबिराची स्थापना केली होती. २०१३ मध्ये सुद्धा इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित दहशतवाद्यांनी त्यांच्या रॅलीमध्ये स्फोट घडवला होता असे ईडीने म्हटले आहे. पीएफआय सदस्य शफिक पायेथच्या विरोधातील रिमांड नोटमध्ये ईडीने हा दावा केला आहे, याला केरळमधून अटक करण्यात आले होते.

( हेही वाचा : धक्कादायक! पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर PFI समर्थकांकडून ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा )

पीएफआयने परदेशात निधी जमा गेला आणि इतर माध्यमातून भारतात पाठवला असा आरोप ईडीने केला आहे. पीएफआय संघटनेचे इतर सदस्य, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या खात्यातूनही निधी पाठवण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे. दरम्यान गुरूवारी ईडी आणि राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) सहकार्याने देशातील सुमारे १३ राज्यांमध्ये छापे टाकण्यात आले. यावेळी एनआयने १०० हून अधिक कार्यकर्त्यांना अटक केली तर ईडीने चार जणांना ताब्यात घेतले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.