खासदार नवनीत राणा आणि त्यांचे वडील हरभजनसिंह रामसिंह कुंडलेस यांच्या विरोधात शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाकडून पुन्हा वारंट जारी करण्यात आलं आहे. बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुंबईतील मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २२ सप्टेंबरच्या सुनावणीत राणा गैरहजर राहिल्या होत्या. त्यांच्या वकिलाने पुन्हा हजेरीतून सूट मिळण्यासाठी अर्जही केले होते मात्र न्यायालयाने अर्ज फेटाळत दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
( हेही वाचा : शांततेच्या बाता करुन दहशतवाद पसरवणे हे तुमचे काम; संयुक्त राष्ट्र महासभेत भारताने पाकिस्तानला फटकारले)
यामुळे आता पुढच्या सुनावणीला नवनीत राणांना त्यांच्या वडिलांसह पुन्हा न्यायालयात हजर रहावे लागणार आहे अन्यथा सत्र न्यायालयात दाद मागावी लागेल. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांते जातप्रमाणपत्र ८ जून २०२१ रोजी मुंबई न्यायालयाने रद्द करून त्यांना दोन लाखांचा दंडही ठोठावला होता. यामुळे त्यांची खासदारकी सुद्धा धोक्यात आली होती.
प्रकरण नेमके काय?
नवनीत राणांनी निवडणूक अर्जासोबक दिलेल्या शपथपत्रात अनुसूचित जमातीबाबत दिलेले प्रमाणपत्र बोगस आहे असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. उच्च न्यायालयाने निर्णय देत जातप्रमाणपत्र रद्द केले. यानंतर २२ जून २०२१ रोजी नवनीत राणांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली.
Join Our WhatsApp Community