तामिळनाडूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सीतारामन यांच्या घरावर पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला. चेन्नईनजीकच्या तांबरम येथील चितलापक्कम येथे शुक्रवारी रात्री ही घटना घडली. हा हल्ला दोन अनोळखी इसमांनी केला असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तांबरमजवळील संघ स्वयंसेवकाच्या घरावर दोन जणांनी पेट्रोल बॉम्ब फेकला. पल्लिकरणाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः रात्रीच्या हल्ल्याची चौकशी करत आहेत. तर स्वयंसेवक सीतारामन यांनी सांगितले की, पहाटे 4 वाजता त्यांना मोठा आवाज आला आणि बाहेर आग लागल्याचे दिसले. त्यांना सुरुवातीला शॉर्ट सर्किट झाले असेल असे वाटले, पण हा प्रकार सॉर्ट सर्किट नसल्याचे स्पष्ट झाले. आम्ही ती आग विझवली आणि पोलीस अधिकाऱ्यांना बोलवल्याचे सीतारामन यांनी स्पष्ट केले.
( हेही वाचा: शीतल म्हात्रेंचा नेम चुकला; मॉर्फ केलेल्या फोटोमुळे समाजमाध्यमांत ट्रोल )
पोलीसांकडून तपास सुरु
एनआयएने तामिळनाडूमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांवर छापे टाकल्यानंतर अज्ञातांनी कोईम्बतूरमधील भाजप कार्यालय आणि कापड दुकानावर पेट्रोल बॉम्ब फेकला होता. मात्र, या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान सीतारामन यांच्या घरावरील हल्ल्यामागे नेमके कोण आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत.
Join Our WhatsApp Community