भारताने बालमृत्यू दर आणखी कमी करत महत्वपूर्ण टप्पा साध्य केला आहे. भारताचे रजिस्टर जनरल यांनी 22 सप्टेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केलेल्या नमुना नोंदणी प्रणाली सांख्यिकी अहवाल 2020 नुसार, 2030 पर्यंत शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने प्रयत्न करताना 2014 पासून देशातील बाल मृत्युदर, 5 वर्षांखालील मुलांचा मृत्युदर आणि नवजात बालक मृत्युदरात लक्षणीय घट होत आहे.
(हेही वाचा : धक्कादायक! पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर PFI समर्थकांकडून ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा)
2030 शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सज्ज
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी या कामगिरीबद्दल देशाचे अभिनंदन केले आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी अथक मेहनत घेतल्याबद्दल सर्व आरोग्य कर्मचारी, सेविका आणि समुदाय सदस्यांचे आभार मानले.
नमुना नोंदणी प्रणाली 2020 ने दिलेल्या माहितीनुसार 2014 पासून सातत्याने घट होत आहे. महत्वपूर्ण उपाययोजना, केंद्र-राज्य सरकारांची मजबूत भागीदारी आणि सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समर्पित प्रयत्नांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत बालमृत्यूसंदर्भातले 2030 चे शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सज्ज झाला आहे.
देशातला 5 वर्षांखालील बालकांच्या मृत्यू दरात (U5MR) 2019 पासून 3 अंकांची (वार्षिक घसरण दर: 8.6%) लक्षणीय घट झाली आहे. (2020 मध्ये 1000 जन्मांमागे 32 च्या तुलनेत 2019 मध्ये 35 प्रति 1000 ).
Join Our WhatsApp Community