सरकारी सेवेत कार्यरत असलेले ४० ते ५० वयोगटातील कर्मचारी, अधिकारी यांना दोन वर्षांतून एकदा आणि त्यापुढील वयोगटातील सर्व कर्मचाऱ्यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी बंधनकारक आहे. या वैद्यकीय चाचण्यांचे काम खासगी संस्थेस देण्यासाठी निविदा मागवण्यात येणार आहेत.
( हेही वाचा : “भारतीय संघाची जर्सी घालून, राष्ट्रगीत म्हणणं हे माझ्या आयुष्यातील सुवर्ण क्षण”- झुलन गोस्वामी)
काही चाचण्या सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध नसतात अशा चाचण्या बाह्य संस्थेद्वारे करून घेण्यास राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत शासकीय मान्यता देण्यात आली आहे. एचएलएल संस्थेत होत असलेल्या चाचण्या वगळून उर्वरित चाचण्या विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य संस्थांमध्ये करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून याची संपूर्ण जबाबदारी संबंधित जिल्हा शल्यचकित्सकांची राहणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य सेवा संचालक या संपूर्ण निविदा प्रक्रियेचे नियंत्रण पाहणार आहेत.
Join Our WhatsApp Community