मुंबई goa- नागपूर समृद्धी महामार्गासारखाच नागपूर ते गोवा महामार्ग तयार करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नागपूर ते गोवा हा महामार्ग मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला जोडून जाईल असे फडणवीस म्हणाले. नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
पुढचे टार्गेट नागपूरला गोव्याशी जोडण्याचे ठेवले
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असताना मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामाला देवेंद्र फडणवीसांनी सुरुवात केली होती. समृद्धी महामार्ग देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम जवळपास पूर्णत्वास गेले आहे. तर काही महिन्यात संपूर्ण महामार्ग तयार होईल असा अंदाज आहे. आता फडणवीसांनी आपले पुढचे टार्गेट नागपूरला गोव्याशी जोडण्याचे ठेवले आहे. दोन सव्वा दोन वर्षच आमच्याकडे आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त वेगाने काम आम्हाला करायचे आहे. आम्हाला २०-२० मॅच खेळायची आहे. त्यामुळे राज्यात वेगाने विकास कामे होताना दिसतील, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.
(हेही वाचा शी जिनपिंग नजरकैदीत, चीनमध्ये घडणार सत्तांतर?)
Join Our WhatsApp Community