पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना ठेचा – राज ठाकरे यांचे आवाहन

165

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या राज्यस्तरीय नेत्यांना एनआयए आणि ईडी या केंद्रीय तपास यंत्रणेने अटक केल्याच्या निषेधार्थ पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. त्यावेळी पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबरचे नारे देण्यात आले. या प्रकरणी बंड गार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक बनले आहेत. अशा घोषणा देणाऱ्यांना सरकारने ठेचले पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.

तुमचा धर्म घ्या, आणि पाकिस्तानात चालते व्हा

देशविरोधी घोषणा देणाऱ्या ६० ते ७० जणांवर पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी हे आंदोलन करण्यात आले होते. एनआयएने छापे घातले आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली, म्हणून पुण्यात ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा दिल्या. सरकारने ह्यांना वेळीच ठेचले पाहिजे. ही अटक कशासाठी झाली? तर दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणे, त्यांची प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, ह्या गंभीर आरोपांखाली…थोडक्यात देशद्रोही कृत्यांसाठी. तरीही ह्या देशद्रोह्यांचे समर्थन करत जर ह्या PFI च्या कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल, तर तुमचा धर्म घ्या, आणि पाकिस्तानात चालते व्हा. ही थेरं आमच्या देशांत चालणार नाहीत, असे राज ठाकरे यांनी निक्षुण सांगितले. माझी केंद्रातील आणि राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की, फक्त ह्या देशद्रोह्यांनाच नव्हे तर त्यांच्या ह्या समर्थकांना पण अशी अद्दल घडवा की, यापुढे पाण्यासाठी देखील ( पा ) उच्चारता येणार नाही, नाहीतर आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत, असेही राज ठाकरेंनी म्हटले. हिंदुस्थानातील हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील हिंदू मरहट्ट्यांच्या मुठी जर आवळल्या तर ह्या हरामखोरांना कुठे पाय लावून पळायला लागेल हे मला सांगायला लावू नका. ह्या सगळ्याने उगाचच सणासुदीच्या काळात अशांतता पसरेल. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित असल्याचं राज ठाकरेंनी पोस्टद्वारे म्हटलं आहे.

(हेही वाचा शी जिनपिंग नजरकैदीत, चीनमध्ये घडणार सत्तांतर?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.