MSRTC एसटीतील अनेक महिला कर्मचारी बालसंगोपन रजेपासून वंचित

129

गाव तिथे एसटी, प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी महामंडळात महिलांकडेदेखील विविध जबाबदाऱ्या सोपावल्या आहेत. एसटीमधील या महिला कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत. या महिला कर्मचारी तसेच अधिकारी यांना त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी सहा महिन्यांची बालसंगोपन रजा मंजूर कऱण्याचा निर्णय तत्कालीन परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी २०१८ मध्ये जाहीर केला होता. पण त्याची अंमलबजावणी नीट होत नसल्याची खंत महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केली आहे.

(हेही वाचा – ‘इतिहासातील खानांची उचकी लागणारे आता कुठल्या बिळात बसले आहेत?’, भाजपचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल)

पुढे ते असेही म्हणाले की, महिला कर्मचाऱ्यांना प्रसूतिकाळात सहा ऐवजी नऊ महिन्यांची रजा देण्याचा निर्णय देखील महामंडळाकडून घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी चांगल्याप्रकारे होते. पण मागील जवळपास दोन वर्षांपासून या बाल संगोपन रजेचा लाभ काही महिला कर्मचारी अधिकाऱ्यांना मिळालेला नाही.

प्रशासनाविरोधात महिला कर्मचाऱ्यांचा संताप

सण, यात्रा असो किंवा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांना नोकरीवर हजर रहावे लागते आणि आपली सेवा बजवावी लागते. त्यामुळे ना रजा ना त्यांचा मोबदला तसेच कुटुंबासाठी वेळ देता येत नसल्याने एसटी महामंडळातील महिला कर्मचाऱ्यांना बाल संगोपन रजा देण्याचा निर्णय तत्कालीन परिवहन मंत्र्यांनी घेतला होता. यामध्ये मुलाचे शिक्षण चांगल्या पद्धतीने व्हावे व त्यांच्याकडे काही वेळ का असेना, लक्ष देता यावे हा सामाजिक दृष्टीकोन ठेऊन हा निर्णय घेण्यात आला होता. तरीही त्याचे पालन नीट होत नसल्याने अनेक महिला कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला असून सर्वसामान्य प्रवाशांसह पंढरपूरची वारी असो किंवा कोरोना सारखी महामारी असो किंवा कोणतेही सणं-उत्सव असो एसटी बस कर्मचारी कायम प्रवाशांच्या सेवेत तत्पर असतात.

परंतु नोकरी करत असताना एसटीतील महिला कर्मचारी व अधिकारी त्यांना त्यांच्या मुलांच्या परिक्षांच्या काळात पालकांची गरज असते पण तसे घडताना दिसत नाही. या उलट अधिकाऱ्यांकडून या रजा नामंजूर केल्या जात असल्याने महिला एसटी कर्मचाऱ्याचं म्हणणं असून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.