सध्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची जोरदार चर्चा आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला 24 सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे नाव चर्चेत असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरुर यांनी देखील आता या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे ठरवले आहे.
30 सप्टेंबर रोजी थरुर हे निवडणूक अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये अध्यक्षपदासाठी चांगलीच चुरस होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
19 ऑक्टोबर रोजी मिळणार नवा अध्यक्ष
22 सप्टेंबर रोजी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून 24 सप्टेंबरपासून निवडणूक अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. 8 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असून 17 ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. तसेच 19 ऑक्टोबर रोजी काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची घोषणा करण्यात येणार आहे.
(हेही वाचाः राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी पायलट यांचे नाव हवेतच, ‘या’ नावाची होत आहे चर्चा)
24 वर्षांनी बिगर काँग्रेसी अध्यक्ष
काँग्रेसच्या अध्यक्षपदाला गांधी घराण्याची मोठी परंपरा लाभली आहे. त्यामुळे निवडणुकीतून काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड होण्याची ही चौथी वेळ असणार आहे. या निवडणुकीत गांधी कुटुंबापैकी कोणीही भाग न घेतल्यामुळे तब्बल 24 वर्षांनंतर काँग्रेसला गांधी घराण्याव्यतिरिक्त अध्यक्ष मिळणार आहे. याआधी सीताराम केसरी हे काँग्रेसचे बिगर काँग्रेसी अध्यक्ष होते, त्यानंतर अध्यक्षपदाची धुरा ही सोनिया गांधी यांच्यावर सोपवण्यात आली होती.
Join Our WhatsApp Community