5G Service Launch: ‘या’ वर्षापर्यंत संपूर्ण भारतात मिळणार 5G इंटरनेट, केंद्रीय मंत्र्यांची घोषणा

128

सध्याच्या डिजीटल युगात काळाच्या एक पाऊल पुढे राहण्यासाठी भारत सरकारकडून फास्टेस्ट इंटरनेट सुविधा देण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी येत्या दिवाळीला देशातील काही भागांत 5G सेवा सुरू केली जाणार असून येत्या दोन वर्षांत संपूर्ण भारतात 5G सेवा सुरू करण्यात येईल, असे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

2024 पर्यंत भारतात 5G नेटवर्क

भारत सरकारकडून ऑगस्ट 2022 मध्ये दूरसंचार सेवा पुरवणा-या कंपन्यांना स्पेक्ट्रम वाटपासंबंधात पत्र जारी केले होते. यानंतर आता भारत हाय-स्पीड अशा 5G दूरसंचार सेवा सुरू करण्यासाठीच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. जिओ आणि एअरटेलने येत्या दिवाळीत भारतातील मुंबई,दिल्ली,कोलकाता आणि चेन्नई यांसारख्या काही प्रमुख शहरांत 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. पण 2023 च्या वर्षअखेरीस 5G नेटवर्कचे जाळे संपूर्ण देशभरात विस्तारणार असून 2024 पर्यंत संपूर्ण भारतात ही सेवा सुरू होईल, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

(हेही वाचाः पीएफआयवर लवकरच येणार बंदी, केंद्र सरकारकडून हालचाली सुरू)

महसूल वाढणार

सध्याच्या 3G आणि 4G च्या तुलनेत 5G इंटरनेच सेवा ही दहा पट जलद असल्याचे सांगण्यात येत आहे. ऑगस्टमध्ये पार पडलेल्या 5G स्पेक्ट्रम लिलावात रिलायन्स जिओ,अदानी ग्रुप,भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या प्रमुख दूरसंचार कंपन्यांनी सहभाग घेतला होता. या लिलावातून मिळणारा महसूल हा सुरुवातीला 80 ते 90 हजार कोटी असल्याचा अंदाज होता. तसेच या सेवेमुळे येत्या काळात महसूल वाढणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान 1 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5G इंटरनेट सेवेचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.