मुंबईत विलेपार्ले येथे आठ ते दहा घरे नाल्यात कोसळली!

138

मुंबईतील विलेपार्ले भागात रविवारी रात्री सात ते दहा घरे नाल्यात कोसळली. या घरांमध्ये कुणीही नव्हते, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. नाल्याला अगदी खेटून असणारी ही घरे रविवारी रात्री नाल्यात कोसळली. इंदिरानगर-2 च्या झोपडपट्टीमधील भागात ही घटना घडली. वेळीच या घरांमध्ये राहणा-या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. एकूण 7 घरे एका मागोमाग एक नाल्यात कोसळतानाचा थरार प्रत्यक्षदर्शींनी मोबाईल कॅमे-यात कैद केला. शनिवारीच यातील काही घरांना तडे गेले होते.

रविवारी दुपारपासून ही घरे कोसळू लागली होती. पण संध्याकाळी सात- साडे सात वाजण्याच्या सुमारास सातही घरे नाल्यात कोसळली. ज्या लोकांची ही घरे होती त्यांना जवळच्याच एका हाॅटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. बीएमसीकडून या लोकांची काळजी घेतली जात आहे. राहते घर कोसळल्याने तिथे राहणा-या लोकांवर आता दु:खाचा डोंगरा कोसळला आहे. पण जीव अगदी थोडक्यात वाचल्याने सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे. काहींनी मेट्रोच्या कामामुळे ही घरे पाडल्याचा आरोप देखील केला आहे. तर काही जणांनी नाल्यात बाजूने माती जावू लागल्याने ही घरे पडल्याचेही म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणी बीएमसी आणि अग्निशमन दलाकडून पुढील तपास केला जात आहे.

( हेही वाचा: ‘मुख्यमंत्र्यांनी ठरवलं असतं तर शिवतीर्थावर आमचाच दसरा मेळावा झाला असता, पण…’, शिंदे गटाने केले स्पष्ट )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.