सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने निर्णायक सामना सहा विकेट्सने जिंकला. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या तिस-या आणि अखेरच्या टी- सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 187 धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने 19.5 षटकातच सामना जिंकला. या विजयासह भारताने तीन सामन्याच्या टी-20 मालिकेत 2-1 अशी आघाडी घेत मालिका जिंकली.
सूर्या आणि विराटची चमकदार खेळी
ऑस्ट्रेलियाच्या संघाने दिलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारताचा सलामीवीर केएल राहुल अवघ्या एका धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर रोहित शर्माने भारतीय संघाची धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, डॅनियल सॅम्सच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना तोही बाद झाला. यानंतर विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणत संघाचा डाव सावरला. त्यानंर 14 व्या षटकातील तिस-या चेंडूवर सुर्यकुमार झेल बाद झाला. पण विराट कोहलीने एक बाजू संभाळून भारताच्या संघाला विजयाकडे आणून ठेवले. मात्र अखेरच्या पाच चेंडूत पाच धावांची गरज असताना, विराट कोहली झेलबाद झाला. त्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्याने चौकार मारुन संघाच्या विजयात योगदान दिले.
( हेही वाचा: मुंबईत विलेपार्ले येथे आठ ते दहा घरे नाल्यात कोसळली! )
Join Our WhatsApp Community