हिमाचल प्रदेश: भीषण अपघातात 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 10 जण जखमी

156

हिमाचल प्रदेश कुल्लू येथेली बंजार पोलीस स्टेशन अंतर्गत झालेल्या भीषण अपघातात 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक तपासानुसार, मृत्यूमुखी पडलेले विद्यार्थी हे  आयआयटी वाराणसीचे विद्यार्थी आहेत. रविवारी रात्री टेम्पो ट्रॅव्हलर्स बस बंजारकडे येत असताना हा अपघात झाला. टेम्पो ट्रॅव्हलर जालोद होल्डिंगजवळ आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो खोल दरीत कोसळला.

( हेही वाचा: राजस्थानमध्ये काँग्रेसच्या तब्बल 92 आमदारांनी दिले राजीनामे; पायलट यांच्या मुख्यमंत्री पदाला विरोध )

पोलीस आणि स्थानिक घटनास्थळी दाखल

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक घटनास्थळी पोहोचले. मात्र मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे जखमींना बाहेर काढण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. जखमींना जवळच्या रुग्णालयात आणण्यात आले, जेथे गंभीर जखमी विद्यार्थ्यांना प्रादेशिक रुग्णालयात कुल्लू येथे प्राथमिक उपचारानंतर पाठवण्यात आले. पोलीस अधीक्षक गुरुदेव शर्मा यांनी सांगितले की, अपघातात 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.