बांगलादेशमध्ये नदीत बोट पलटल्याने 20 जणांचा मृत्यू, तर अनेक जण बेपत्ता

114

बांगलादेशमध्ये नदीत बोट पलटून मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक नागरिक बेपत्ता आहेत. बांगलादेशात रविवारी पंचगड जिल्ह्यात ओव्हरलोड बोट उलटून 20 जणांचा बुडून मृत्यू झाला.

अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

इस्लाम यांनी सांगितले की, बेपत्ता लोकांची नेमकी संख्या माहिती नाही, परंतु प्रवाशांनी सांगितलेल्या माहितीनुसार बोटीत 70 हून अधिक लोक होते. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त लोक भरल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

( हेही वाचा: नवरात्रीनिमीत्त मुख्यमंत्री शिंदेंकडून महिलांसाठी महत्त्वाची घोषणा; महिला आरोग्यासाठी विशेष अभियान )

बांगलादेशात बोट पलटून अनेक अपघात

बांगलादेश गंगा आणि ब्रम्हपुत्रेच्या खालच्या मार्गावर स्थित आहे. बांगलादेश 230 नद्यांनी वेढलेला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मालवाहू जहाजावर प्रवासी फेरी आदळून बुडाल्याने झालेल्या अपघातात सुमारे 37 जणांचा मृत्यू झाला होता. नोव्हेंबरमध्ये देशाच्या दक्षिणेकडील भोला बेटाजवळ ओव्हरलोड ट्रिपल डेकर बोट उलटल्याने 85 लोक बुडाले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.