शिर्डी साईबाबा संस्थानाच्या विश्वस्त मंडळाच्या बरखास्तीचा उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवला आहे. सुनावणीत साई संस्थानचे कामकाज त्रिसदस्यीय समितीच पाहणार आणि सरकारने नवीन विश्वस्त नेमताना ते राजकीय नसावे, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
महाविकास आघाडी सरकारने नियुक्त केलेल्या शिर्डी साईबाबा संस्थानाच्या विश्वस्त मंडळाच्या बरखास्तीचा निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. यानंतर साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, उच्च न्यायालयाने दिलेला बरखास्तीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सूचना दिल्या असून सरकारने नवं विश्वस्त मंडळ नेमताना ते राजकीय नसावे. यासह महिन्याभरात सरकारला या नव्या विश्वस्त मंडळ नेमणुकीसंदर्भात म्हणणे मांडण्याचा आदेश देखील देण्यात आला आहे. त्यामुळे त्रिसदस्यीय समितीच संस्थानाचं कामकाज पाहणार असल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा – उद्धव ठाकरेंनी सुरू केलेल्या ‘शिवभोजन’ योजनेत गैरव्यवहार? शिंदे सरकार घेणार आढावा)
मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डीतील याचिकाकर्ते उत्तमराव शेळके यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. अॅड. सतिष तळेकर यांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने काम पाहिले. यादरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासन आणि प्रतिवाद्यांना नोटीस पाठवली आहे. नोव्हेंबर पहिल्या आठवड्यात पुन्हा सुनावणी होणार असून शिर्डी संस्थान संदर्भातील दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. आशुतोष काळे आणि इतर पाच जणांनी नियुक्त मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्ती रद्द केली त्यासंदर्भात याचिका दाखल केली होती.
न्यायालयाकडून राजकीय लोकांच्या भरतीला नापसंती
सर्व मंदिरात ट्रस्टींच्या नियुक्तीबद्दल नियमावली करण्याची गरज आहे. याबाबत सोमवारी नोटीस जारी करत सर्वोच्च न्यायालयाने राजकीय लोकांच्या भरतीला नापसंती दर्शवली आहे. तर देशातील सर्व मंदिरातील नियुक्ती संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाची टिपण्णी केली आहे. नियुक्त्या संदर्भात नियमावलीची गरज असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. राज्य सरकारने १६ सप्टेंबर २०२१ रोजी शिर्डी साईबाबा संस्थानाचे विश्वस्त मंडळ जाहीर केले होते. त्यावेळी समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांची साईबाबा संस्थानाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती तर जगदीश सावंत यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
विश्वस्त मंडळात एकूण १२ जणांचा समावेश
राज्य सरकारने १६ सप्टेंबर २०२१ रोजी शिर्डी साईबाबा संस्थानाचे विश्वस्त मंडळ जाहीर केले होते. या समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांची साईबाबा संस्थानाच्या अध्यक्षपदी, तर जगदीश सावंत यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. विश्वस्त मंडळात अनुराधा गोविंदराव आदीक, सुहास जनार्दन आहेर, अविनाश अप्पासाहेब दंडवते, सचिन रंगराव गुजर, राहुल नारायण कणाल, सुरेश गोरक्षनाथ वाबळे, जयंतराव पुंडलिकराव जाधव, महेंद्र गणपतराव शेळके, एकनाथ भागचंद गोंदकर आणि अध्यक्ष, शिर्डी नगर पंचायत, अशा एकूण १२ जणांचा समावेश होता.
Join Our WhatsApp Community